EUROPEAN MARATHI SAMMELAN 2027
युरोपीय मराठी संमेलन २०२७
युरोपातील मराठमोळे "अपूर्वरंग"
REGISTERED IN NUREMBERG UNDER:
MAHARASHTRA GERMANY CULTURAL FORUM E.V.
पश्चिमेच्या संस्कृतीशी "अनुबंध" जुळले ।
माय मराठी जपून हृदयी "सीमोल्लंघन" केले ॥
"यात्री आनंदाचे" आम्ही जपतो अमुची नाती ।
"ऋणानुबंधांच्या" धाग्यांनी विणतो रेशीमगाठी ॥
परंपरेचा हा प्रवाह कायम असाच खळखळ वाहो ।
स्नेह-संमेलनाच्या "पुनरागमनास" साथ जोडली जावो ।।
२०२७ मध्ये पुन्हा अनुभवूया
विविध कलांनी सजलेले मराठीचे अंतरंग ।
टीम जर्मनी सहर्ष सादर करीत आहे
युरोपातील मराठमोळे "अपूर्वरंग" ।।
— डॉ. प्राजक्ता ओक
European Marathi Sammelan
- 2012 - अनुबंध
- 2014 - सीमोल्लंघन
- 2016 - आनंदयात्री
- 2018 - ऋणानुबंध
- 2025 - पुनरागमन
- 2027 - अपूर्वरंग
युरोपीय मराठी संमेलन २०२७
युरोपीय मराठी संमेलन (EMS) हे मराठी भाषा, साहित्य, कला आणि सांस्कृतिक वारसा यांच्या जतन‑संवर्धनासाठी कार्यरत असलेले युरोपातील अग्रगण्य व्यासपीठ आहे. विविध क्षेत्रांतील तज्ञ, उद्योजक, कलाकार आणि रसिकांना एकत्र आणत ज्ञानविनिमय आणि सांस्कृतिक आदानप्रदानासाठी हे संमेलन आपल्या सगळ्यांना एक सुवर्णसंधी उपलब्ध करून देते.
१९९८ साली नेदरलँड्समध्ये प्रारंभ झालेल्या या उपक्रमाने गेल्या दोन दशकांत युरोपातील अनेक प्रमुख शहरांमध्ये यशस्वी वाटचाल केली आहे. २०२७ मध्ये—तब्बल २७ वर्षांनंतर—जर्मनीला पुन्हा एकदा या प्रतिष्ठित संमेलनाचे यजमानपद लाभत आहे, ही जर्मनीतील मराठी समुदायासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.
२५ ते २७ जून २०२७ या कालावधीत हे संमेलन फ्रांकफुर्टजवळील निसर्गरम्य “बाद नाऊहाइम” येथे आयोजित करण्यात येणार आहे. या वर्षीची संकल्पना “अपूर्वरंग” ही विविध कलावैभव, साहित्यिक अभिव्यक्ती, आधुनिक विचारधारा आणि सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडवणारी ठरणार आहे.
आपली मराठमोळी परंपरा साजरी करण्यासाठी, आपली कला सादर करण्यासाठी आणि नामवंत कलाकार व तज्ञांशी संवाद साधण्यासाठी, मायमराठीशी असलेली नाळ जपणाऱ्या सर्व रसिकांना या संमेलनात सहभागी होण्याचे मनःपूर्वक आमंत्रण !
जर्मनीमध्ये आपले हार्दिक स्वागत !
OUR PARTNERS & SPONSORS
We are grateful to our partners and sponsors for their invaluable support in making this EMS 2027 a grand success.
Support EMS 2027
Showcase your brand to the European Marathi diaspora.